मराठीबद्धल माहिती असाव्या अशा काही महत्त्वाच्या गोष्टी


भारतीय साहित्यात ‘ज्ञानपीठ’ हा मानाचा पुरस्कार समजला जातो. हा पुरस्कार मराठीतील ज्या काही निवड मराठी लेखकांना मिळाला अशा निवडकांपैकी एक नाव म्हणजेच वि. वा. शिरवाडकर. त्यांचे संपूर्ण नाव विष्णू वामन शिरावाडकर उर्फ ‘कुसुमाग्रज’. आपल्या लेखणीतून शिरवाडकरांनी प्रतिभासंपन्न असे साहित्य निर्माण केले. केवळ ज्ञानपीठ मिळाला म्हणून त्यांचे श्रेष्ठत्व सिद्ध होत नाही. तर, त्यांनी प्रतिभेच्या जोरावर मराठी साहित्याला जी उंची प्राप्त करून दिली. त्यावरून त्यांचे श्रेष्ठत्व ठरते. केवळ मराठी साहित्यिक म्हणून शिरवाडकर यांच्याकडे पाहता येणार नाही. तर, मराठी साहित्य संस्कृती आणि भारतीय भाषिक लेखकांचे प्रतिनिधी म्हणूणही त्यांच्याकडे पहावे लागेल. २७ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस. अशा या थोर लेखकाचा जन्मदिवसही तितक्याच थोरपणे साजरा केला जावा, ही समस्त मराठी साहित्यप्रेमी आणि मराठीजनांची भावना. म्हणूनच २७ फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो.

आपण मोठ्या अभिमानाने ‘जागतिक मराठी भाषा दिन’ साजरा करतो. पण, खरोखरच आपल्याला मराठीबद्धलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी माहित आहेत का? ज्या काही गोष्टी ढोबळमानाने माहित असतात त्या सर्वांनाच माहित असतात. अनेकजण नकारार्थी मान हलविण्याची शक्यता आहे. पण, तुम्ही जर या गोष्टी काळजीपूर्वक वाचल तर, तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल आणि मराठी असूनही आपल्याला या गोष्टी कशा माहित नाही याबाबत खेदही वाटेल. मात्र, लक्षात ठेवायला फारशा कठीण नसलेल्या या गोष्टी तुम्ही जाणून घ्याल तर, नक्कीच तुमचाही उर अभिमानाने भरून येईल.

जगभरात मराठी भाषा दिन साजरा केला जातो. लोकसंख्येनुसार मराठी ही सर्वात जास्त बोलली जाणारी भारतातील चौथी आणि जगातील चौदावी भाषा आहे. मराठी भाषेची निर्मिती संस्कृतमधून निर्माण झालेल्या महाराष्ट्री प्राकृत व अपभ्रंश या भाषांपासून झाली आहे. याउलट मराठी आणि काही अन्य भारतीय भाषांच्यावर संस्कार होऊन संस्कृत भाषा बनली असेही काही अभ्यासकांचे म्हणणे आहे.

जगभर मराठी ही बोलली जाणारी भाषा आहे. त्यात मॉरिशस आणि इस्त्रायलसोबतच अमेरिका, संयुक्त अरब अमिरात, दक्षिण आफ्रिका, सिंगापूर, जर्मनी, युनायटेड किंगडम (यूके), ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज या प्रमुख देशांचा समावेश आहे. सध्यस्थितीला मराठी भाषा बोलणाऱ्यांची सेख्या लोकसेख्या सुमारे ९,००,००,००० आहे. मराठी ही इसवीसन ९ व्या शतकापासून बोलली जाते असे मानले जाते. मात्र, त्याही अगोदरपासून मराठी भाषा बोलली जात होती, असा अलिकडील काही भाषासेशोधकांचा दावा आहे. महाराष्ट्रासोबतच मराठी ही गोव्याचीही राजभाषा असून, ती गोवा, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू, छत्तीसगड या राज्यांसोबतच दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांमध्येही बोलली जाते.

Leave a Comment