विवोचा वाय ५३ स्मार्टफोन लाँच


नवी दिल्ली : खास आपल्या ग्राहकांसाठी चीनची मल्टिनॅशनल टेक्नॉलॉजी कंपनी विवोने आपला नवा स्मार्टफोन विवो वाय ५३ नुकताच लाँच केला असून हा स्मार्टफोन यापूर्वी मलेशियामध्ये लाँच करण्यात आला असून त्याची किंमत जवळपास १० हजार ४९५ रुपये ऐवढी असणार आहे.

या स्मार्टफोनमध्ये ५ इंच QHD डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचबरोबर ६.० मार्शमेलो अँड्राइड ऑपरेटिंग सिस्टम, १.४ GHz क्वाड-कोर क्वॉल कॉम स्नॅपड्रगन ४२५चा प्रोसेसर, २जीबी रॅम, १६ जीबी इंटरनल स्टोरेज क्षमता देण्यात आली आहे. याफोनमध्ये ८ मेगापिक्सलचा LED फ्लॅशसह रिअर आणि ५ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर डय़ुअल सिम, ४जी LTE, GPS, ब्लूटूथ, वायफाय असे अन्य फिचर्स देण्यात आले आहेत.

Leave a Comment