गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या ‘या’ फोटोवर अनेकांनी केल्या कमेंट्स


पणजी – सोशल मीडियाचा वापर सध्याच्या काळात प्रत्येकजण हा करत असल्याचे पहायला मिळत आहे. सोशल मीडियात सेलिब्रेटी, राजकारणी, क्रिकेटर्स असो किंवा सामान्य नागरिक प्रत्येकजण आपले स्टेटस आणि फोटोज अपलोड करत असतात. गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी अशाच प्रकारे सोशल मीडियात आपला एक फोटो शेअर केला आणि त्यानंतर त्यांच्यावर अनेकांनी टीकाही केली.

एका रिसॉर्टमधील स्विमिंगपूलमध्ये आंघोळ करत असतानाचा आपला फोटो लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी फेसबुकवर शेअर केला. हा फोटो फेसबुकवर शेअर केल्यानंतर तो व्हायरल झाला आणि त्यावर अनेकांनी कमेंट्सही केल्या. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी येथील एका फॉरेस्ट रिसॉर्ट स्विमिंग पूलमधील फोटो फेसबुकवर अपलोड केला. तसेच त्यावर कॅप्शन लिहिले की, “Relaxing after elections. Guess who? Guess where?”. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पोस्ट केलेल्या या फोटोनंतर अनेकांनी लाईक करत कॉमेंट केल्या. तर काहींनी टीका करत त्यांना ट्रोल केले आहे.

लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या फेसबुक टाईमलाईनवर अंकित नावाच्या युझरने कमेंट करत म्हटले आहे की, तुम्ही लवकरच कायमचे आराम कराल. तर राहूल नावाच्या युझरने म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांना सिक्स पॅक्स अॅब्स बनवल्या पाहिजेत. आपल्यावर टीका होत असल्याचे पाहून लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी फेसबुक पोस्टवरील कॅप्शन बदलली आणि “Communing with nature. A refreshing experience”. असे कॅप्शन लिहिले.

Leave a Comment