उदया वर्षातील पहिले कंकणाकृती सूर्यग्रहण


जगभरातील खगोलप्रेमींसाठी या महिन्याच्या शेवटी होणारे सूर्यग्रहण पर्वणी ठरणार असून या सूर्यग्रहणाविषयी सर्व जगभरात चर्चा होत आहे. या महिन्यात होणारे सूर्यग्रहण हे या वर्षातील पहिले सूर्यग्रहण ठरणार आहे. चंद्र सुर्यासमोरुन जाणार आहे, तेव्हा हे सूर्यग्रहण होईल. या सूर्यग्रहणाचे वैशिष्ट्य म्हणजे हे सूर्यग्रहण कंकणाकृती असेल. म्हणजेच सूर्य एखाद्या बांगडीसारखा दिसणार आहे. जगभरातील सर्व खगोलप्रेमी हे सूर्यग्रहण पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

हे सूर्यग्रहण २६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. सूर्यासमोर चंद्र येईल आणि सूर्याच्या फक्त चमकदार कडा आपल्याला दिसतील. त्यामुळेच या सूर्यग्रहणाला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात. सूर्यग्रहण हा एक नैसर्गिक योगच असतो. या सूर्यग्रहणाची सुरुवात चिलेमधून होणार आहे आणि दक्षिण अमेरिकेमध्ये सकाळपासून दिसायला सुरुवात होईल. त्यानंतर दक्षिण अटलांटिक महासागराच्या भागात हे सूर्यग्रहण दिसेल. नैऋत्य अफ्रिकेमध्ये हे सूर्यग्रहण संपेल.

ग्रहण सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका रेषेत आल्यावर होते. पृथ्वीभोवती फिरताना २६ फेब्रुवारीला चंद्र सूर्या समोरुन जाईल. सूर्यग्रहण हे पूर्णपणे नैसर्गिक असते परंतु काही ठिकाणी सूर्यग्रहणाला अशुभ मानले जाते. हे सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नये असा सल्ला देण्यात आला आहे. भारतीय खगोलशास्त्र प्रेमींना हे सूर्यग्रहण पाहता येणार नाही. हे सूर्य ग्रहण केवळ लॅटिन अमेरिका, नैऋत्य अफ्रिका, प्रशांत महासागर, अटलांटिक आणि अंटार्टिका या भागात दिसणार आहे. त्यामुळे भारतीय खगोलशास्त्र प्रेमी या सूर्यग्रहणाला मुकणार आहेत. पुढील सूर्यग्रहण २१ ऑगस्ट रोजी आहेत. हे सूर्यग्रहण अमेरिकेमध्ये दिसणार आहे.

Leave a Comment