पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद


मुंबई : तुमची बँकेची काही कामे पुढील आठवड्यात असतील तर ती सोमवारी, बुधवार आणि गुरुवारीच आटोपून घ्या. कारण पुढच्या आठवड्यात बँकांना चार दिवस सुट्टी असून २१ फेब्रुवारी मंगळवारी मुंबई आणि महाराष्ट्रात मतदानासाठी सुट्टी देण्यात आली आहे. त्यानंतर बुधवार आणि गुरुवार हे दोन दिवस बँका सुरु राहतील. त्यानंतर शुक्रवार महाशिवरात्री असल्याने बँक बंद त्यासोबतच चौथा शनिवार आल्याने ती सुट्टी आणि रविवार. अशी सलग तीन दिवस बँकेला सुट्टी असणार आहे. त्यामुळे आगामी आठवड्यात तुम्ही बँकेची काही महत्त्वाची कामे करणार असला तर तुम्हाला या तीन दिवसांतच उरकावी लागतील.

Leave a Comment