उत्तर प्रदेशात अवघ्या १ रुपयात साडी!


वाराणसी – एक रुपयांच्या नाण्यांचे काही वेळासाठी का होईना पण वाराणसीत अच्छे दिन आले. फक्त १ रुपयात साडी खरेदी करण्याची स्कीम शहरातील महमूरगंज येथे एका दुकानमालकाने काढली अन् बघता-बघता तरुणींच्या व महिलांच्या लोंढेच्यालोंढे साडी घेण्यासाठी दुकानात अवतरले. साड्या खरेदी करण्यासाठी महिला अक्षरश: तुटून पडल्या.

दुकानात झुंबड उडाल्यामुळे पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती. शेवटी साडी खरेदी करण्यासाठी रांगेत उभे राहाण्याची वेळ महिलांवर आली. पाहता-पाहता रांग थेट रस्त्यावर जाऊन पोहोचली अन् वाहतुकीची कोंडी झाली. अखेर पोलिसांना घटनास्थळी दाखल होऊन गर्दी पांगवावी लागली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून दुकानदाराला नाईलाजाने स्कीम बंद करावी लागली.

स्कीम बंद केल्यामुळे तासन्-तास रांगेत उभे असलेल्या महिलांचा पारा भडकला. अनेक महिलांनी याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. अगोदर पाचशे रुपयांची खरेदी केल्यानंतर मग एका रुपयात एक साडी खरेदी करता येणार, अशी ही स्कीम होती. पण दुकानदाराने जाहिरात करताना ‘अवघ्या एका रुपयात साडी’ अशी जाहिरात केली अन् प्रंचड गोंधळ उडाला.

Leave a Comment