चक्क बकरीच्या पिल्लाला गरोदर महिलेने दिला जन्म


आजपर्यंत तुम्ही जगभरात घडणा-या अनेक विचित्र घटना ऐकल्या असतील किंवा पाहिल्या असतील. मात्र, आज तुम्हाला अशा एका घटनेसंदर्भात आम्ही सांगणार आहोत जे ऐकल्यानंतर आणि पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. होय…. कारण, चक्क बकरीच्या पिल्लाला एका गरोदर महिलेने जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नायजेरियामधील एका गरोदर महिलेची प्रसुती झाली आणि त्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. दोन वर्षांपासून ही महिला गरोदर होती आणि दोन वर्षांनंतर या महिलेची डिलिव्हरी झाली असून तीने चक्क बकरीच्या पिल्लाला जन्म दिल्याचे समोर आले आहे. या घटनेचे फोटोजही सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहेत.

सायमन चुकवु (Simeon Chukwu) नावाच्या एका व्यक्तीने आपल्या फेसबुक पेजवर हे फोटोज शेअर केले असून या व्यक्तीचे म्हणणे आहे की, दोन दिवसांपूर्वी नायजेरियातील पोर हारकोर्ट येथे या महिलेची डिलिव्हरी झाली असून तीने एका बकरीच्या पिल्लाला जन्म दिला आहे.

चक्क बकरीच्या पिल्लाला एका महिलेने जन्म दिल्याचे ऐकूण सर्वांनाच एक धक्का बसला आहे. या महिलेच्या परिवारातील सदस्यांचे म्हणणे आहे की, गेल्या दोन वर्षांपासून ही महिला त्रस्त होती. आता तिची डिलिव्हरी झाली असून तीला लेबर पेन पासून मुक्ती मिळाली आहे. एवढेच नाही तर या महिलेने बकरीच्या पिल्लाला जन्म दिल्याचे वृत्त सर्वत्र पसरताच परिसरातील नागरिकांनी पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती.

Leave a Comment