व्हॉट्सअॅपचे टू-स्टेप व्हेरिफिकेशन फीचर


व्हॉट्सअॅपच्या युझर्सची मागणी आणि सुरक्षा लक्षात घेऊन व्हॉट्सअॅप नेहमीच नव-नवे अपडेट्स उपलब्ध करत असते. आता आपल्या युजर्ससाठी पुन्हा व्हॉट्सअॅपने बहुप्रतिक्षित टू-स्टेप-व्हेरिफिकेशन फीचर लागू करण्याची घोषणा केली आहे.

आपले नवे टू-स्टेप व्हेरिफिकेशन फिचर सर्वाधिक वापरले जाणारे मेसेंजिग अॅप व्हॉट्सअॅपने लाँन्च केले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून व्हॉटसअ‍ॅप टू-स्टेप व्हेरिफिकेशन या फीचरचे टेस्टिंग करत होते. या टेस्टिंगनंतर आता अँड्रॉईड, आयफोन आणि विंडोजच्या सर्व यूजर्ससाठी हे फीचर उपलब्ध करण्यात आले आहे. टू-स्टेप व्हेरिफिकेशनमुळे तुमचे अकाऊंट सुरक्षित होते. या फीचरमुळे ६ अंकाचा पासवर्ड टाकल्याशिवाय कोणीही तुमचा नंबर अॅक्टिव्हेट करु शकत नाही.

त्यासाठी तुम्हाला व्हॉटसअ‍ॅपवरील सेटींगमध्ये जात अकाऊंटवर क्लिक करावे लागेल. या विभागात आपल्याला टू-स्टेप-व्हेरिफिकेशन’ हा पर्याय दिसेल. याच्या खाली असलेल्या ‘इनेबल’वर क्लिक करून आपण या सुरक्षा फीचरचा वापर करू शकता. हे फीचर अॅक्टिव्ह झाल्यानंतर यूजर्सला याचा सहा आकडी पासवर्ड तयार करावा लागेल. तसेच सोबत तुमचा ईमेलही द्यावा लागेल. पासवर्ड विसरल्यास त्याच्या रिकव्हरीसाठी ईमेलचा वापर करता येईल.

या टू-स्टेप-व्हेरिफिकेशन फीचरचा पासवर्ड जर तुम्ही विसरला आणि तो पासवर्ड ई-मेलच्या माध्यमातून रिकव्हर करण्याचा प्रयत्न देखील केला नाही. तर आपण सात दिवसांपर्यंत आपल्या मोबाईलवर व्हॉट्सअ‍ॅपला ‘रिव्हेरिफाय’ करून वापरू शकणार नाहीत. म्हणजेच सात दिवसानंतर पासवर्डशिवाय आपण व्हाटसअ‍ॅप वापरू शकाल.

Leave a Comment