आजपासून ट्विटर संमेलन


मुंबई : आजपासून अखिल भारतीय साहित्य संमेलनाची सुरुवात होत असून हेच निमित्त साधत ऑनलाईन व्यासपीठावर ट्विटर संमेलनही घेतले जाणार आहे. संमेलनाचे आयोजन ‘मराठी वर्ड’ या ट्विटर अकाऊंट ग्रुपने केले आहे. ट्विटर संमेलन ३ फेब्रुवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान असेल. यामध्ये ट्विटरवरील मराठी यूझर्सना सहभागी होता येणार आहे.

आतापर्यंत इंग्रजी भाषिक यूझर्स ट्विटरवर मोठ्या प्रमाणावर दिसत होते. पण आता मराठी यूझर्सचे प्रमाणही वाढले आहे. ट्विटरवर मराठी यूझर्सची वाढती संख्या पाहता ‘मराठी वर्ड’ या ट्विटर हँडलने ‘ट्विटर संमेलन’ आयोजित करण्यास सुरुवात केली आहे. मराठीचे ट्विटरविश्व अधिकाधिक फुलावे आणि मराठीत रोज एक लक्ष ट्विट्स लिहल्या जाव्यात ह्या ध्येयातूनच #ट्विटरसंमेलन ह्या कल्पनेचा जन्म झाला, असे ‘मराठी वर्ल्ड’ टीमकडून सांगण्यात येते आहे. चार दिवस वेगवेगळ्या हॅश टॅगचा वापर करून मराठी यूझर्स संमेलनात सहभागी होऊ शकतील.

ट्विटर संमेलनाचा मुख्य हॅशटॅग #ट्विटरसंमेलन आहे आणि सोबत १२ हॅशटॅग देण्यात आले आहेत. या हॅशटॅगच वापर करुन व्यक्त होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हे आहेत ते १२ हॅशटॅग :
#माझीकविता
#माझीकथा
#माझाब्लॉग
#माझीबोली
#साहित्यसंमेलन
#वाचनिय
#हायटेकमराठी
#बोलतोमराठी
#मराठीशाळा
#भटकंती
#खमंग
#माझाछंद

Leave a Comment