फेसबुकच्या अतिवापरामुळे मानसिकता होत आहे संकुचित


नवी दिल्ली : मानसिकता ही फेसबुकच्या अतिवापरामुळे संकुचित होत असून आपण फेसबुकवर स्वतःला आवडणाऱ्या बातम्या आणि स्वतःच्या मताशी जुळणाऱ्या विचारांनाच प्राधान्य देतो. आपल्याला सोशल मीडिया हा स्वतंत्र, पक्षपाती बनवतो किंवा तसे होण्यास भाग पाडतो, असे एका संशोधनात म्हटले आहे.

हे संशोधन अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठाच्या संशोधकांनी केले असून फेसबुक युझर्स त्यांच्या मताशी जुळणाऱ्या पोस्टला लाईक करतात, शेअर करतात आणि इतर पोस्टवर दुर्लक्ष करतात, असे संशोधनात आढळून आल्याचे संशोधकांनी सांगितले आहे. ज्या प्रकारचा फेसबुक युझर्सचा समज आहे, त्याच प्रकारच्या गोष्टी ते फेसबुकवर शेअर करतात, असे संशोधक अलेसँद्रो बेसी यांनी सांगितले. पीएएनएस या जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आले आहे.

Leave a Comment