एका मिनिटात आऊट ऑफ स्टॉक झाला ‘ रेडमी नोट ४’


नवी दिल्ली – नुकताच रेडमी नोट ४ हा अत्याधूनिक फिचर्स असणारा स्मार्टफोन चिनी स्मार्टफोन निर्माती कंपनी शाओमीने भारतीय बाजारपेठेत लाँच केला आहे. शाओमीच्या वेबसाईटवर आणि ऑनलाईन कंपनी फ्लिपकार्टवर रेडमी नोट ४ हा स्मार्टफोन कालपासून विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.

या स्मार्टफोनची काल दुपारी १२ वाजता विक्री सुरू झाली. मात्र हा फोन विक्रीसाठी उपलब्ध होताच केवळ एका मिनिटात या फोनचा स्टॉक संपला. या फोनची पुढील विक्री ३० जानेवारीपासून सुरु करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. शाओमीचा हा फोन तीन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. २ जीबी रॅम / ३२ जीबी इंटर्नल स्टोरेज , ३ जीबी रॅम / ३२ जीबी इंटर्नल स्टोरेज आणि ४ जीबी रॅम / ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज या व्हेरिंएंट्समध्ये हा फोन उपलब्ध आहे. त्यांची किंमत अनुक्रमे ९ हजार ९९९, १० हजार ९९९ आणि १२ हजार ९९९ रुपये आहे.

Leave a Comment