विराट कोहली बरोबर भागीदाराची संधी


आपण व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असाल तर कोट्यावधी क्रिडारसिकांच्या मनात घर करून राहिलेल्या यूथ आयकॉनबरोबर भागीदारी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली देशभर जिम व फिटनेस सेंटर्सचा विस्तार करत आहे. चिशेल ब्रँड खाली ही शृंखला सुरू केली जात असून ७५ ठिकाणी त्याच्या फ्रँचायझी दिल्या जाणार आहेत.

यासाठी काही विशेष अटी आहेत. म्हणजे या सेंटरसाठी कुठल्याही शहरात किमान एका स्टोअरएवढी म्हणजे ३ ते ४ हजार चौरस फुटांची जागा रहिवासी अथवा व्यापारी क्षेत्रात असायला हवी. त्यासाठी शहरांनुसार २० ते ३० लाख रूपये फी द्यावी लागेल मात्र रॉयल्टी अथवा कमिशन द्यावे लागणार नाही.या सेंटरमध्ये वर्ल्डकलास जिम उपकरणे, कॅफे, हेल्थ फूड, ट्रेनिंग, डायेटिशन, फिजिओ थेरपी,एरोबिक्स सेंटर अशा सुविधा असतील शिवाय वेट लॉस ट्रेनिग प्रोग्रॅमही असतील. यासाठी किमान १ कोटी रूपयांची गुंतवणूक करावी लागेल व त्यासाठी किमान दीड वर्ष पेबॅक परियड असेल असे समजते. इच्छुकांनी त्यासाठी वेबसाईटवर जाऊन तेथील लिंकवर आपली माहिती द्यायची आहे. व अर्ज करायचा आहे.

Leave a Comment