एटीएममधून दिवसाला काढता येणार १० हजार रूपये


मुंबई – भारतीय रिझर्व्ह बँकेने आज जाहीर केलेल्या निर्णयानुसार आता एटीएममधून पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ करण्यात आली असून त्यानुसार दिवसाला एटीएममधून दहा हजार रूपयांची रक्कम काढता येईल. ही मर्यादा यापूर्वी ४५०० रुपये ऐवढी होती. मात्र, एटीएममधून आठवड्याला २४ हजार रूपये काढण्याची मर्यादा कायम ठेवण्यात आली आहे. याशिवाय, बँकेच्या चालू खात्यातून रक्कम काढण्याच्या मर्यादेतही वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी ही मर्यादा ५० हजार इतकी होती, ती आता एक लाख ऐवढी करण्यात आली आहे.

Leave a Comment