
लिम्फोसिटीक ल्युकेमिया या रक्ताच्या कर्करोगग्रस्त रुग्णांकरताच्या औषधाला ऑस्ट्रेलिया प्रशासनाने मान्यता दिली असून मेलबॉर्नमधील वेनेटोक्लॅक्समध्ये ‘वेनक्लेक्स्टा’ नावाचे हे औषध विकसित करण्यात आले आहे. हे औषध कर्करोगाच्या पेशींच्या वाढीला सहाय्यक ठरणा-या बी सी एल २ या प्रोटिनला वेनक्लेक्स्टा वितळवण्याचे आणि नियंत्रणात ठेवण्याचे काम करते. दिवसाला रुग्णांना ही एक गोळी घ्यावी लागणार आहे. चौथ्या स्टेजमधल्या कर्करुग्णांना सुद्धा हे औषध देता येणार आहे. विशेष म्हणजे केमोथेरपी घेऊ न शकणारे तसेच इतर उपचारांना प्रतिसाद न देणाऱ्या कर्करुग्णांनाही वेनक्लेक्स्टा हे औषध घेता येणार आहे.
