
एअरटेल नंतर आता आयडियाने देखील अनलिमिटेड कॉलची मर्यादा वाढविण्याची घोषणा केली आहे. ४जी मोबाईल घेणाऱ्या नव्या ग्राहकाला ३ जीबी अतिरिक्त मोबाईल ब्रॉडबँड डेटा उपलब्ध करून देणार आहे. एअरटेलसारखाच प्लान आयडियाने आणला आहे. ज्यात यूझर्सला फ्री इंटरनेट डेटा दिला जाणार आहे.
आयडिया देणार अनलिमिटेड कॉलसोबत एक वर्षासाठी ४जी डेटा
या ऑफरनुसार कंपनीच्या सध्याच्या ४जी मोबाईल धारकांना ३४८ रुपयांच्या रिचार्जवर १जीबी डेटा मोफत दिला जाणार आहे. त्याचबरोबर अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा देखील दिली जाणार आहे. जर नवीन ग्राहक ४जी मोबाईलमध्ये या प्लानचा रिचार्ज करतात, तेव्हा त्यांना अतिरिक्त ३जीबी इंटरनेट डेटा दिला जाईल. या रिचार्जची वैधता २८ दिवसांची असून या ऑफरची वैधता १ वर्षाची आहे. त्यामुळे ग्राहक या प्लाननुसार एका वर्षात १२ वेळा रिचार्ज करू शकतात.
