जिओनीसाठी विराट कोहली ब्रँड अँबेसिडर


चीनी स्मार्टफोन कंपनी जिओनीने टीम इंडिया क्रिकेट कप्तान विराट कोहली याची ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा सोमवारी केली आहे. जिओनीने भारतात आत्तापर्यंत १ कोटी २० लाख फोन विकले गेले आहेत. येत्या कांही दिवसांत विराट या ब्रँडची जाहिरात करेल. बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट यापूर्वीच या कंपनीशी जोडली गेली आहे.

कंपनीचे सीईओ अरविंद व्होरा म्हणाले, भारतात अतिशय लोकप्रिय असलेले दोन चेहरे आमच्या कंपनीशी जोडले गेल्यामुळे करोडो लोकांच्या चेहर्‍यावर हास्य फुलणार आहे. जिओनीची भारतात दोन उत्पादन केंद्रे आहेत शिवाय भारताबरोबरच्या व्यापारात अडीच पट वाढ करण्याचा प्रयत्नही केला जात आहे. यंदाच्या वर्षात भारतात कंपनी ५०० ब्रँड स्टोअर्स सुरू करणार असून विक्री प्रतिनिधींची संख्या २० हजारांवर नेण्यात येणार आहे.

Leave a Comment