गुजरातमध्ये अदानी समुहाची ४९ हजार कोटींची गुंतवणूक


अडानी समुह येत्या पाच वर्षात गुजराथेत ४९ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करणार असल्याचे कंपनीचे अध्यक्ष गौतम अडानी यांनी मंगळवारी जाहीर केले. व्हायब्रंट गुजराथ ग्लोबल समिटमध्ये अडानी यांनी ही घोषणा केली. ही गुंतवणूक गुजराथेतील सर्व महत्त्वाच्या बंदरांचा विकास व अक्षय उर्जा क्षेत्रात करण्यात येणार आहे.

यावेळी बोलताना गौतम अडानी म्हणाले, मुंद्रा, हजीरा, दाहेज, टूना यासह गुजराथेतील सर्व बंदरे विकसित करण्यासाठी अडानी समूह १६७०० कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे. तसेच २०२१ पर्यंत अक्षय उर्जा क्षेत्रात सौर उर्जा, पवन उर्जा प्रकल्पांसाठी २३००० कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. अक्षय उर्जा क्षेत्रात भारताला जगात अग्रस्थान मिळवून देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी अक्षय उर्जा व्हिजन आखली आहे. त्या अंतर्गत गुजराथेत १६४८ मेगावॉट वीज मिर्मितीची संयंत्रे स्थापन केली गेली आहेत.

Leave a Comment