एका क्लिकवर मुंबईतील फ्री वायफाय मिळणारी ठिकाणे


मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरुन मुंबईकरांना सार्वजनिक वायफाय सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने ‘आपले सरकार मुंबई वाय-फाय’ या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ ट्विट करून केला.

मुंबईकरांना या टप्‍प्यात पाचशे सार्वजनिक हॉटस्पॉट्स उपलब्ध झाले असून आपले सरकार मुंबई वायफाय या प्रकल्पांतर्गत मुंबई शहरात १ मे २०१७ पर्यंत १२०० हॉटस्पॉट्स कार्यान्वित करण्यात येणार आहेत. या स्वरुपाचा हा भारतातील सर्वात मोठा प्रकल्प असून वापरकर्ते नागरिक आणि ‘वायफाय लोकेशन्स’ची संख्या लक्षात घेता जगातील सर्वांत मोठ्या प्रकल्पांपैकी तो एक प्रमुख प्रकल्प असेल.

५०० ठिकाणांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment