अच्छे दिन; प्रत्येकाच्या खात्यात जमा होणार काही रक्कम


नवी दिल्ली : देशातील प्रत्येक नागरिकाच्या खात्यात एक रक्कम केंद्र सरकारकडून जमा केली जाऊ शकते. याबाबत एका हिंदी वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार याची घोषणा आर्थिक सर्वे आणि बजेटमध्ये होऊ शकते. सगळ्या नाही पण सरकार अशा लोकांसाठी ही योजना लागू करु शकते ज्यांच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही आहे. अशा लोकांच्या खात्यात 500 रुपये जमा करुन या योजनेती सुरुवात होऊ शकते.

याचा फायदा देशातील जवळपास २० कोटी गरजूंना होऊ शकतो. लंडन यूनिवर्सिटीचे प्रोफेसर गाय स्टँडिंग यांनी हा प्रस्ताव तयार केला आहे. त्यांनी दावा केला आहे की, मोदी सरकारमधील एका व्यक्तींने सांगितले आहे की, आगामी बजेटमध्ये याची घोषणा होऊ शकते. प्रोफेसर गायने संकेत दिले आहेत की, मध्य प्रदेशातील एका पंचायतीत सरकारने पायलट प्रॉजेक्ट म्हणून या स्कीमवर काम केले आहे. जेथे सकारात्मक गोष्टी समोर आल्या, मी माझ्या प्रपोजलमध्ये श्रीमंत-गरीब सगळ्यांसाठी एका उत्पनाची गोष्ट मांडली आहे. प्रोफेसर गाय संपूर्ण जगात यूनिवर्सल बेसिक इनकमवर काम करत आहेत.

Leave a Comment