मार्चपर्यंत बाजारात येणार रद्द झालेली सर्व रक्कम


नवी दिल्ली – १६ मार्च २०१७ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे रद्द झालेले १५ लाख ४४ हजार कोटी रुपये बाजारात येणार असून ही माहिती प्रत्येक आठवड्याला येणाऱ्या स्टेट बँकेच्या अहवालातून समोर आल्यामुळे नोटाबंदीमुळे रद्द झालेली संपूर्ण रक्कम बाजारात येण्यास अद्याप २ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लागणार आहे.

काही दिवसांपूर्वी स्टेट बँकेच्या प्रमुख अरुंधती भट्टाचार्य यांनी चलनातून रद्द झालेल्या १५ लाख ४४ हजार कोटी रुपयांपैकी साडे सात लाख कोटी रुपये चलनात आले असल्याची माहिती दिली होती. १० लाख कोटी रुपये बाजारात आल्यावर परिस्थिती नियंत्रणात येईल, असेदेखील भट्टाचार्य म्हणाल्या होत्या. जानेवारीच्या अखेरपर्यंत १० लाख रुपये बँकेत जमा होतील, असे स्टेट बँकेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा नोटाबंदीच्या निर्णयानंतर चलनातून बाद झाल्या. या नोटांचे मूल्य १५ लाख ४४ हजार कोटी रुपये होते. बँक आणि बाजारांमध्ये या दिवशी २ लाख ५३ हजार कोटी रुपये १०० आणि ५० रुपयांच्या नोटांच्या स्वरुपात उपलब्ध होते. बँकांकडून सध्या दररोज ११ हजार कोटी रुपयांच्या नोटा बाजारात आणल्या आहेत. हा वेग लक्षात घेता ३१ जानेवारीपर्यंत आणखी ३ लाख ४७ हजार कोटी रुपये बाजारात येतील. त्यामुळे बाजारातील चलन तुटवडा जानेवारीच्या अखेरपर्यंत संपेल, असे एसबीआयच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Comment