अश्लील म्हणत फेसबुकने ब्लॉक केला ऐतिहासिक फोटो


इटलीतील बोलोग्‍ना शहरामधील एक फोटो फेसबुकने ब्लॉक केला असून यासाठी फेसबुककडून हा एक नग्न पुतळ्याचा फोटो आहे आणि अल्‍गोरिदमच्या प्रोग्रामिंगनुसार हा फोटो फेसबुकच्या पॉलिसीच्या विरोधात असल्याचे कारण देण्यात आले आहे. हा फोटो नेपच्यून पुतळ्याचा असून तो बोलोग्‍ना शहरात बसवलेल्या कारंजाच्या शान आहे. या पुतळ्याचे निर्माण इ.स. १५०० साली करण्यात आले आहे. जगभरातील ऐतिहासिक वास्तूंपैकी एक असलेल्या पुतळ्याला फेसबुक कामुक मानते.

Leave a Comment