नामवंत कंपन्या आणताहेत पाण्यावर चालणार्‍या कार्स


ऑटोमोबिल कंपन्यांनी नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने पेट्रोल, डिझेल, सीएनजीला पर्याय देणार्‍या नव्या इंधनावरच्या गाड्या आणण्याच्या प्रयोगात एक पाऊल आणखी पुढे टाकले असून इलेकट्रीक, हायब्रीड कारनंतर हायड्रोजन पॉवर फ्यूल सेल कार सादर केल्या आहेत. या कार्स पाण्याचा वापर करून त्यातून वेगळ्या केलेल्या हायड्रोजनवर चालणार आहेत. होंडा, हयुंडाई, निकोला मोटर्स, टोयाटो या नामवंत कंपन्या यात आघाडीवर आहेत.

निकोला मोटर्सने हायड्रोजन पॉवर ट्रक तयार केला असून तो १५ मिनिटात रिफ्यूल होतो व एकदा रिफ्यूल झाल्यानंतर तो १९३१ किमीचे अंतर कापू शकतो. ही कंपनी २०१८ मध्ये अमेरिकेत ३६४ हायड्रोोजन स्टेशन्स उभारणार आहे. होंडाने याच तंत्रज्ञानावर चालणारी त्यांची क्लॅरिटी ही कार नव्या व्हर्जनमध्ये सादर केली असून ती युकेमध्ये चालविली जात आहे. ही कार तीन ते ५ मिनिटात रिफ्यूल होते व ६०० किमीचे अंतर कापते.

टोयोटोची मिरे याच तंत्रज्ञानावर काम करते. ती ऑस्ट्रेलियात विकली जात असून तिचे दोन टँक फुल केले की ५५० किमीचे अंतर ती कापू शकते. तेथे ही कार लोकप्रिय होत असल्याचेही समजते. होंडाने आयएक्स ३५ कारची पहिली सहा युनिट युकेत विकली आहेत व या कारची मागणीही वाढती आहे. ही कार एकदा रिफ्यूल केल्यानंतर ४०० किमी हून जास्त अंतर कापते. लेक्सर ने त्यांची याच तंत्रज्ञानावरची पहिली कार २०२० मध्ये बाजारात आणणार असल्याचे जाहीर केले असून टोक्यो ऑलिंपिक गेम्सच्या वेळी ती सादर केली जाणार आहे.

Leave a Comment