बजाजची ‘डॉमिनर ४००’ भारतात लॉन्च

bajaj
मुंबई – नवी शानदार ‘डॉमिनर ४००’ ही बाईक देशातील प्रमुख टू व्हिलर निर्मिती करणारी कंपनी बजाज ऑटोने लॉन्च केली आहे. ही ४०० सीसीची दमदार बाईक असून देशभरातील शोरूममध्ये बजाजच्या या नव्या बाईकची विक्री सुरू होणार आहे. बजाज डॉमिनर ४०० मध्ये ३७३ सीसीचे सिंगल ऑईल कूल्ड इंजिन देण्यात आले आहे.

बजाजची डॉमिनर ४०० ही नवी बाईक आतापर्यंतची सर्वात जास्त इंजिन क्षमता असलेली बाईक असून डॉमिनर स्पॅनिशवरून या बाईकचे नाव घेण्यात आले आहे. ज्याचा अर्थ एक्सीड इन पॉवर म्हणजेच ऊर्जा असा होतो. या बाईकमध्ये ६ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे. ही बाईक दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आली असून त्यातील एकाची किंमत १ लाख ३६ हजार इतकी ठेवण्यात आली आहे. तर डिस्क ब्रेक व्हेरिएंटची किंमत १ लाख ५० हजार इतकी ठेवण्यात आली आहे.

३५ बीएमपीची पॉवर देणारे इंजिन या बाईकमध्ये आहे. बजाज ऑटो या बाईकला पॉवर क्रूजरच्या रूपात सादर करीत आहे. यात अ‍ॅन्टी लॉक ब्रेकिंग सिस्टम(एबीएस) स्टॅंडर्ड फिचर्सच्या रूपात येते. डॉमिनर ४००मध्ये डिजिटल डिस्प्ले लावण्यात आला आहे आणि याच्या फ्य़ूल टॅंकवरही डिजिटल कंसोल देण्यात आला आहे.

Leave a Comment