या हॉटेलचे नांवच आहे डिव्होर्स हॉटेल

hotel
जगभरात विविध नावाची व विविध सुविधा पुरविणारी लक्षावधी हॉटेल्स आहेत. त्यांची कांही खास वैशिष्ठ्येही आहेत. मात्र नावावरून हॉटेलचे वैशिष्ठ समजेल असे एक हॉटेल नेदरलँडमध्ये सुरू केले गेले असून या हॉटेलचे नावच डिव्होर्स हॉटेल असे आहे. या हॉटेलची कल्पना जिम हाल्पन याची असून तो लवकरच या हॉटेलची ब्रँच अमेरिकेतही सुरू करणार आहे. वैवाहिक आयुष्याला त्रासलेले किंवा प्रेम संपुष्टात आलेले व वेगळे होण्याचा विचार असलेल्या सर्व जोडप्यांचे येथे स्वागत आहे कारण येथे तुम्हाला ग्राहक म्हणून ट्रीट केले जात नाही तर तुम्ही त्यांचे सन्माननीय पाहुणे असता.

divorse
या हॉटेलची जाहिरातच मुळी त्रयस्थ प्रदेशात, रिलॅक्स वातावरणात, जलद, कौशल्यपूर्ण व परवडणार्‍या किमतीत घटस्फोट देणारे स्थळ अशी केली गेली आहे. हॉटेल अतिशय नयनमनोहर प्रदेशात आहे. येथे वकीलांची सोयही आहे. ऑफिसातून,, ऑनलाईन पद्धतीने व हॉटेल डिव्होर्स असे पर्यायही दिले गेले आहेत. विकएंडला शुक्रवारी तुम्ही आलात तर रविवार सायंकाळपर्यंत घटस्फोटाची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याची सोय आहेच. अर्थात येथे फक्त विवाहित जोडप्यांनाच प्रवेश दिला जातो हे सांगायला नकोच.

Leave a Comment