अशी झाली होती नोटबंदीची गुप्त तयारी

athia
एका रात्रीत अचानक चलनातून ५०० व १हजारच्या नोटा रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर करून देशातून एका फटक्यात ८६ टक्के चलन बेकार ठरविणारी ही घटना वाटते तशी अचानक घडलेली नाही तर त्यासाठीची तयारी वर्षभर सुरू होती असे आता उघड झाले आहे. यासाठी मोदींच्या विश्वासातले व खात्रीचे काही अधिकारी व युवा संशोधकांची टीम अतिशय गुप्तपद्धतीने मोदींच्या कार्यालयातच काम करत होती व या तुकडीचे नेतृत्व करत होते महसूल सचिव हसमुख अधिया.

हसमुख अधिया यांच्यासोबच पाच अन्य अधिकारीही या मोहिमेत होते मात्र ही योजना अतिशय गुप्त ठेवली गेली होती. अधिया या बॅकरूम टीमवर नजर ठेवून होते व ही टीम निवडताना अधियांसह सर्वच अधिकारी फारसे प्रसिद्ध किंवा बातम्यातून झळकणारे नसतील याची पूर्ण काळजी घेतली गेली होती. अनेकांना तर हे अधिया कोण हेही माहिती नव्हते. हसमुख अधिया १९८१ च्या गुजराथ केडर बॅचचे आयएएस अधिकारी. मोदी कोअर टीमचे सदस्य म्हणून त्यांना कामाचा दांडगा अनुभव शिवाय २००४ ते २००६ या काळात मोदी गुजराथचे मुख्यमंत्री असताना ते त्यांचे मुख्य सचिव होते. मोदींशी त्यांची जवळीक खूपच. त्यामुळे दोघांत कांही महत्त्वाचे बोलणे होत असेल तर गुजराथीत बोलण्यावर दोघांचाही भर असतो असेही सांगितले जाते.

भाजपने निवडणूक जाहीरनाम्यान काळा पैसा व भ्रष्टाचार हे महत्त्वाचे मुद्दे केल्याने त्यासंदर्भात कांही तरी भक्कम पाऊल उचलणे पक्षाला भाग होते व त्यातून हा निर्णय घेतला गेला असेही समजते. अर्थात त्यापूर्वी अनेक प्रश्नांची उत्तरे बेमालूम मिळविली गेली होती. उदाहरणार्थ, नव्या नोटा किती वेगाने छापल्या जाऊ शकतात, त्याचे वितरण कसे होते, सार्वजनिक बँकातून मोठ्या संख्येने रोकड जमा झाली तर त्याचे फायदे तोटे कोणते अशी माहिती मिळविली गेली होती व त्यानुसार ही योजना तयार केली गेली. मोदींचे सोशल मिडीया अकौंट व स्मार्टफोन अॅपचे काम करणारे युवा एकसपर्ट यांनीही या संदर्भात मोलाचे योगदान दिले. निर्णय झाल्यावर कॅबिनेटमध्ये कल्पना देताना मोदींनी ही योजना फसली तर ती जबाबदारी पूर्णपणे माझी असल्याचेही सांगितले होते.

Leave a Comment