आरबीआयकडे नोटाबंदीनंतर जमा झाल्या बारा लाख कोटींच्या जुन्या नोटा

rbi
नवी दिल्ली : नागरिकांनी नोटाबंदीच्या निर्णयानंतर मोठ्या प्रमाणावर जुन्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा जमा केल्या असून आरबीआयकडे जुन्या नोटांची अंदाजे १२ लाख कोटी रुपयांची रक्कम जमा झाल्याची माहिती आहे.

११.५८ लाख कोटी रुपयांच्या जुन्या नोटा सहा डिसेंबरपर्यंत जमा झाल्या आहेत. आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी या संदर्भातले आकडे जाहीर केले असून नोटाबंदीनंतर सुमारे ४ लाख कोटीच्या नव्या नोटा आणि १ हजार ९१० कोटीच्या कमी रकमेच्या (शंभर किंवा त्याखालील) नोटा व्यवहारात आणण्यात आल्या. याशिवाय पुढच्या ३ ते ४ आठवड्यात मोठ्या प्रमाणावर ५००च्या नव्या नोटा व्यवहारात येतील, अशी माहिती अर्थसचिव शक्तीकांत दास यांनी दिली. आरबीआयने एक हजारच्या नव्या नोटांसंदर्भात कुठलाही निर्णय घेतला नसल्याचे उर्जित पटेल यांनी स्पष्ट केले आहे. आरबीआय लवकरच शंभर, पन्नास आणि वीस रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणणार आहे. त्याचप्रमाणे वीस, पन्नास आणि शंभरच्या जुन्या नोटाही चलनात राहणार असल्यामुळे नागरिकांनी कसलीही काळजी करण्याची गरज नाही, असे आरबीआयने म्हटले आहे.

Leave a Comment