निवृत्त कर्मचारी नोटा छापण्यासाठी पुन्हा कामावर रुजू

note1
नवी दिल्ली : सध्या देशभरात नोटाबंदीमुळे नोटांचा तुटवडा जाणवत आहे. सध्या मध्य प्रदेशमधील देवासस्थित सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मीटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या युनिट बीएनपीमध्ये दिवसाचे २४ तास नोटा छपाईचे काम सुरु असून देवासमध्ये सध्या सर्वाधिक २०००च्या नोटा छापल्या जात आहेत.

सध्या तिथे निवृत्त कर्मचाऱ्यांनाही कामावर बोलवण्यात आले आहे. त्यांना साधारण १५ हजार रुपये वेतन दिले जात आहे. प्रेसमधील एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीप्रमाणे, सध्या प्रत्येक कर्मचाऱ्यावर कामाचा दबाव आहे. याआधी इतका दबाव कधी नव्हता. त्यात लहानशी चूकही मोठी समस्या निर्माण करु शकते याची भितीही आहे. तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला दररोज देवास येथून दोन कंटेनर नोटा पाठवल्या जात असल्याचीही माहिती आहे. तेथील कर्मचाऱ्यांची जेवणाची वेळही कमी करण्यात आली आहे. त्याचबरोबर या कर्मचाऱ्यांना इन्सेंटिव्हही देण्यात येणार आहे. अशीच काहीशी स्थिती होशंगाबाद येथील नोटांचे कागद बनवणाऱ्या पेपर मिलची आहे. येथेही २४ तास नोटांचे कागद बनवण्याचे काम सुरु आहे.

Leave a Comment