भारतात लवकरच येणार लेनोव्हा व्हाईब के ६ पॉवर

lenovo
नवी दिल्ली – व्हाईब श्रेणीतील के ६ पॉवर हा नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी जगातील अग्रगण्य स्मार्टफोन निर्मिती कंपनी लेनोव्हाने सुरू केली आहे. ग्राहकांकडून या स्मार्टफोनला जबरदस्त प्रतिसाद मिळेल, असा कंपनीने विश्वास व्यक्त केला आहे. कंपनीकडून करण्यात आलेल्या ट्विटनुसार व्हाईब के ६ पॉवर हा स्मार्टफोन २९ नोव्हेंबर रोजी दिल्लीत लाँच करण्यात येणार आहे.

कंपनीने या स्मार्टफोनची घोषणा बर्लिनमधील आयएफए २०१६ व्यापारी परिषदेत केली होती. त्यावेळी कंपनीने के सीरिजमधील के ६ नोटच्या लाँचची घोषणा केली होती. लिनोव्हा व्हाईब के ६ पॉवर स्मार्टफोनमध्ये ५ इंचाचा एचडी स्क्रीन (७२०×१२८० पिक्सेल रिझॉल्युशन), ६४ बिट १GHz मीडियाटेक क्वार्ड-कोर प्रोसेसर, २जीबी व ३ जीबी रॅममध्ये मॉडल उपलब्ध. १६ व ३२ जीबी इंटरनल मेमरी, त्याचबरोबर १२८ जीबीपर्यंत मेमरी वाढवण्याची सुविधा. १३ मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा व ८ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमरा, एलईडी फ्लॅशसहित, ड्युअल सिम स्लॉट (मायक्रो), 4G LTE, जीपीएस, ब्लूटूथ, वाय-फाय, यूएसबी कनेक्टव्हिटी आणि ४००० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

1 thought on “भारतात लवकरच येणार लेनोव्हा व्हाईब के ६ पॉवर”

Leave a Comment