
मुंबई : सर्वसामान्य नागरिकांना नोटबंदीमुळे थोडा त्रास होत असला तरी अनेकांकडून या निर्णयाचे स्वागत होत आहे. ५०० रुपयांच्या जुन्या नोटा काही ठिकाणी वापरण्यास सरकारने सूट दिली आहे. जुन्या नोटा १५ डिसेंबरपर्यंत वापरता येणार आहेत. याचा फायदा घेत अनेक जण जुन्या ५०० च्या नोटा घेऊन प्रीपेड मोबाईल रिचार्ज वाउचर खरेदी करत आहे. पण असे वाटत असेल की यावर कोणाचे लक्ष नाही पण सावधान, यावर सरकारचे सरळ लक्ष आहे.
तुमच्या ५०० रुपयाच्या मोबाईल रिचार्जवर देखील सरकारचा वॉच!
रिटेलरला अशा लोकांची माहिती देण्यास सरकारने सांगितली आहे, जे ५०० चे रिचार्ज करत आहेत. देशात एकूण ९० टक्के लोक प्रिपेड सेवा वापरतात. त्यामुळे जर अशा माध्यमातून कोणी काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न करत असेल तर सरकार अशा मोबाईलनंबरवर सरळ लक्ष ठेवून आहेत.
