रिझर्व्ह बँकेच्या लग्नासाठी आता सात अटी

rbi
नवी दिल्ली – लग्नाला पैसे काढण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आता सात अटी ठेवल्यामुळे लग्न असणाऱ्यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता असून ज्यांच्या घरात लग्नकार्य आहे, त्यांना सध्या नोटाबंदीमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. लग्न पत्रिका दाखवून अडीच लाख रुपये काढण्याची मुभा सरकारने दिली होती. मात्र रिझर्व्ह बँकेने रोखीचा व्यवहार बंद करण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल टाकत नवी सूचना जारी केली आहे.

त्यासाठी रिझर्व्ह बँकेने खालील प्रमाणे सात अटी ठेवल्या आहेत-
१. लग्न असणाऱ्यांना ३० डिसेंबरपर्यंत अडीच लाख रुपये काढता येतील. मात्र हे पैसे तुमच्या खात्यात ८ नोव्हेंबरपूर्वी जमा केलेले असावेत. ३० डिसेंबर किंवा त्यापूर्वी असलेल्या लग्नासाठीच हे पैसे काढता येतील.
२. वर-वधू किंवा त्यांच्या आई-वडिलांनाच पैसे काढता येतील. वर आणि वधू वेगवेगळे अडीच लाख रुपये काढू शकतात.
३. ज्या व्यक्तीला हे पैसे द्यायचे आहेत, त्यांचे बँकेत खाते नसावे.
४. पैसे काढताना पुरावा म्हणून लग्न पत्रिका, लग्नासाठी लागणाऱ्या खर्चाची पावती दाखवावी लागेल.
५. लग्न पत्रिकेसोबत वर आणि वधू यांची संपूर्ण माहिती द्यावी लागेल.
६. तुम्ही लग्नासाठी घरात पैसे जमवून ठेवले असतील आणि या जुन्या नोटा बदलून घेण्याचा विचार असेल तर तसे आता करता येणार नाही.
७. बँड, मंडप, केटरिंगसह सर्व खर्चाची पावती दाखवणे आवश्यक आहे.

Leave a Comment