२३ नोव्हेंबरपासून रेल्वे तिकिटावरील हटणार सुविधा अधिभार

railway
नवी दिल्ली – आयआरसीटीसीवरुन तिकीट बुक करताना लागणार सुविधा अधिभार २३ नोव्हेंबरपासून हटवण्याचा निर्णय सरकारने घेतला असून हा निर्णय पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याने घेण्यात आला आहे. ऑनलाईन तिकीट बुक करताना सध्या सुविधा अधिभार चार्ज लागतो.

हा अधिभार वेगवेगळ्या क्लाससाठी वेगवेगळा असतो. ई-तिकीट बुक करताना स्लीपर क्लाससाठी २० रुपये आणि एसी क्लाससाठी ४० रुपये सेवा शुल्क द्यावा लागतो. एवढेच नाही तर या सेवा शुल्कावर १५ टक्के आणखी एक सेवा कर द्यावा लागतो. रेल्वेच्या या निर्णयामुळे ऑनलाईन तिकीट बुक करणाऱ्या कोट्यवधी प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयानंतर प्रत्येक प्रवाशाचे तिकीटामागे २३ रुपयांपासून ४६ रुपयांची बचत होईल.

नोटाबंदीनंतर मोठ्या संख्येने लोक काऊंटरवर जाऊन तिकीट घेत आहेत. तसेच सुविधा अधिभारापासून वाचण्यासाठी लोक काही वेळ रांगेत उभे राहून तिकीट घेणे पसंत करत आहेत. पण आता आयआरसीटीसीवरुन ऑनलाईन तिकीट बुक करण्यासाठी हा अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे आता रेल्वे प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.

Leave a Comment