नुस्ली वाडियांकडून टाटा सन्सला मानहानीची नोटीस

nusli
टाटा ग्रूपच्या कही कंपन्यांचे स्वतंत्र संचालक असलेले नुस्ली वाडिया यांनी टाटा सन्सला मानहानीची नोटिस पाठविली असल्याचे समजते. या नोटिसीमध्ये त्यांच्यावर अपमानजनक, खोटे तसेच निंदानालस्ती करण्यात आल्याचे आरोप केले असून हे सर्व आरोप मागे घ्यावेत असे बजावले आहे. टाटा सन्सने या नोटिसीला कायदेशीर उत्तर दिले जाईल असे स्पष्ट केले आहे.

टाटा ग्रुपच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांना अचानक काढून टाकण्याचा प्रकार घडल्यानंतर कांही कंपन्यांचे संचालक असलेल्या वाडीयांनी मिस्त्रींच्या बाजूने मत व्यक्त केले होते. त्यानंतर वाडिया यांचीही हकालपट्टी करण्यासाठी जनरल बॉडीची मिटींग बोलावण्यात आली होती तेव्हा वाडियांवर कंपनीच्या नुकसानीस जबाबदार असल्याचे तसेच कंपनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचे आरेाप केले गेले होते.या आरोपांवर वाडिया यांनी २१ नोव्हेंबरला टाटा सन्सला नोटिस बजावली होती व हे आरोप त्यांच्या प्रतिमेचे नुकसान करणारे असल्याचे म्हटले होते.