डोनाल्ड ट्रम्प यांचे सोन्याचे विमान

plane
नवी दिल्ली – अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सध्या जगभरात एकच चर्चा जास्त रंगली आहे. हिलरी क्लिंटन यांना हरवून अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योगपती डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे नवे राष्ट्रपती झाले आहेत. नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी डोनाल्ड ट्रम्प हे चर्चेत असतात. त्यांची संपत्तीही नेहमीच वादात सापडली आहे.

डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष झाले आणि अमेरिकेत त्यांचा विरोध सुरू झाला. महिलांच्या प्रकरणातही ते अनेकदा वादात सापडले आहेत. ट्रम्प यांच्याकडे एक प्लेन असून या प्लेनला सोन्याचा मुलामा लावला आहे. फोर्ब्सनुसार, ट्रम्प यांची संपत्ती २४ हजार कोटी डॉलर इतकी आहे. ट्रम्प यांचे हे प्लेन ट्रम्प ७५७ या नावाने लोकप्रिय आहे.

२४ कॅरेट गोल्डने हे ट्रम्प ७५७ प्लेन ट्रम्प यांनी सजवले आहे. हे प्लेन आतून बाहेरून कसे आहे हे दाखवणारा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात एक महिला ट्रम्प यांच्या या आलिशान प्लेनही माहिती देत आहे.

Leave a Comment