सोन्याच्या दरात चार हजारांची वाढ

gold
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केल्यानेतर एकच खळबळ उडाली असून सोन्याच्या दरावरही याचा परिणाम झाल्याचे बघायला मिळत आहे. सोन्याचा दरात प्रतितोळा तब्बल चार हजार रुपयांनी वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांना आता सोने अधिक महाग झाले आहे.

सध्या सोन्याचा भाव ३० हजार रुपये प्रतितोळा एवढा असून आता प्रतितोळा थेट ३४ हजारांवर पोहोचला आहे. महत्त्वाचे म्हणजे आगामी काळात सोन्याचा दर ३८ हजारांपर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज सोने व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे. लोकांच्या घबराटीमुळे सोन्याचा भाव वाढ वाढल्याचा दावा, तज्ज्ञांनी केला आहे.

Leave a Comment