डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला

share-market
मुंबई: चलनातून ५०० आणि १०००च्या नोटा बाद करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतल्यानंतर आज सकाळी शेअर बाजारात मोठी घसरण आली आहे.तब्बल १५०० अकांनी सुरूवातीला सेन्सेक्स गडगडला होता. तर निफ्टीमध्ये ४६८ अकांची घसरण झाली होती. दरम्यान, बाजार सुरु होताच किंचित सुधारणा होऊन सेन्सेक्समध्ये १००० अकांची घसरण पाहायला मिळाली. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण, रुपया २३ पैशांनी घसरून ६६.८५ वर पोहोचला आहे.

भारतीय शेअर बाजार एकीकडे मोदींचा निर्णय आणि दुसरीकडे अमेरिकेतील निवडणूकीमुळे डगमगल्याचे बोलले जात आहे. अमेरिकेतील राष्ट्रपती पदासाठी होत असलेल्या निवडणूकीत हिलरी क्लिंटन यांना धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे ही घसरण झाल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे भारतीय बाजारात सोन्याच्या दरात तब्बल ४००० हजाराने वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याच्या दर तब्बल ३४ हजारावर जाऊन पोहचला आहे. भारतात ५०० आणि १०००च्या नोटा रद्द केल्याच्या निर्णयाने गुंतवणूकदारांमध्ये घबराटीचे वातावरण असले तरी शेअर बाजार घसरण्यामागे अमेरिकेतील निवडणूक देखील कारणीभूत आहे. असे तज्ज्ञांचे मत आहे.

Leave a Comment