शाओमीच्या रेडमी सिरिजचे तीन स्मार्टफोन लॉन्च

xaiomi
बीजिंग: बीजिंगमध्ये शाओमीने एका इव्हेंटमध्ये आपल्या रेडमी सिरीजमधील तीन नवे स्मार्टफोन लाँच केले आहेत. आहे. यावेळी कंपनीने रेडमी ४, रेडमी ४ए आणि रेडमी ४ प्राइम लाँच केले आहेत. रेडमी ४ ची किंमत जवळजवळ ६९०० रुपये, रेडमी ४ प्राइमची किंमत ८९०० रुपये आणि रेडमी ४ एची किंमत ४९०० रुपये ऐवढी आहे.

दरम्यान रेडमी ४ आणि रेडमी ४ प्राइमच्या प्री ऑर्डर सुरु झाल्या आहेत. या स्मार्टफोनची विक्री येत्या सोमवारपासून सुरु होणार असून तर रेडमी ४एची विक्री ११ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. रेडमी ४ आणि रेडमी ४ प्राइममध्ये मेटल यूनिबॉडी, २.५D कर्व्ह्ड ग्लास देण्यात आले आहे. तर दोन्ही स्मार्टफोनमध्ये ड्यूल सिम सपोर्ट असून रिअर पॅनल फिंगरप्रिंट सेन्सरही आहे.

रेडमी ४मध्ये ५ इंच स्क्रिन आहे. तर याचे रिझोल्यूशन ७२०X१२८० पिक्सल आहे. यामध्ये १.४GHz ऑक्टा कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४३० प्रोसेसर आहे. तसेच २ जीबी रॅमही आहे. या स्मार्टफोनमध्ये ड्यूल एलईडी फ्लॅशसोबत १३ मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. रेडमी ४ मध्ये १६ जीबी इंटरनल मेमरी असून १२८ जीबीपर्यंत मेमरी वाढवता येऊ शकते. यामध्ये 4जी, LTE , वाय-फाय, ब्ल्यूटूथ आणि जीपीएस कनेक्टिव्हिटी ऑप्शन आहेत.

त्याचबरोबर रेडमी ४ प्राइममध्ये ४ इंच डिस्प्ले असून याचे रिझोल्यूशन १०८०X१९२० पिक्सल आहे. यामध्ये २ Ghz ऑक्टाकोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६२५ चिपसेट आहे. यासोबत यात ३ जीबी रॅम असून यात ३२ जीबी इंटरनल मेमरी देखील आहे.लाँच झालेल्या रेडमीचा स्वस्त स्मार्टफोन ४एमध्ये ड्यूल सिम सपोर्ट असून ५ इंच स्क्रीन आहे. या स्मार्टफोनचे रिझोल्यूशन ७२०x१२८० पिक्सल आहे. १.४GHz क्वॉड कोअर स्नॅपड्रॅगन ४२५सोबत २ जीबी रॅम आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सल रिअर कॅमेरा असून ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.

Leave a Comment