जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान ७६ वाघांचा मृत्यू

tiger
मुंबई – एकूण ७६ वाघांचा जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून देशभरातील ही आकडेवारी असून या यादीत मध्यप्रदेश सर्वात आघाडीवर आहे, तर कर्नाटकचा या यादीत दुसरा क्रमांक आहे. २०१० पासूनची आकडेवारी पाहता वाघांचा मृत्यूचा हा आकडा आतापर्यंता उच्चांक आहे. २०१५ मध्ये ६९ वाघांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली होती. संवर्धनकर्त्यांनी वाघांची शिकार वाढली असून अनेक भागांमध्ये मृतदेह सापडले असल्याचे सांगत अलर्ट जारी केला आहे.

ही आकडेवारी टायगरनेट कडून जाहीर करण्यात आली असून राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि ट्राफिक-इंडियाने संयुक्तरित्या ही आकडेवारी दिली आहे. ७६ पैकी ४१ वाघांच्या मृत्यूचे कारण समजू शकलेले नसून याचा तपास सुरु आहे. तर इतर वाघांच्या मृत्यूमागे शिकार, विषप्रयोग, रस्ते अपघात, वीजेचा शॉक लागून आणि एकमेकांवर केलेला हल्ला कारणीभूत ठरले आहे.

शिकार केल्याच्या जास्त घटना ऑगस्ट ते नोव्हेंबरदरम्यान समोर येतात, मात्र ट्राफिक इंडियाचे मुख्य शेखर कुमार निरज यांनी यावेळी ट्रेंड वेगळाच दिसत असल्याचे, सांगितले आहे. यावर्षी परिस्थिती गंभीर असून वाघांच्या मृत्यूत १० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Leave a Comment