दोन वेळा जन्मली ही मुलगी

linlee
आईच्या गर्भातून एकच बालक दोन वेळा जन्म घेणे कधीच शक्य नाही हे विज्ञानालाही मान्य आहे. मात्र टेक्सास मध्ये हा चमत्कार घडला आहे. लिनली नावाच्या एका चिमुकलीने आईच्या गर्भातून चक्क दोन वेळा जन्म घेण्याची किमया केली असून आई व बाळ दोघेही सुखरूप आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार मार्गारेट बोएमर ही महिला गरोदर असताना चार महिने होत आले तेव्हाच गर्भातील मुलीच्या पाठीमागे ट्यूमर असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. २३ व्या आठवड्यापर्यंत हा ट्यूमर बाळाच्या आकाराचा झाला तेव्हा बाळाच्या जीवाला धोका निर्माण झाला. त्यामुळे डॉक्टरांनी तातडीने गर्भातून बाळ बाहेर काढून शस्त्रक्रियेच्या सहाय्याने हा ट्यूमर काढून टाकला व त्यानंतर बाळ पुन्हा गर्भात बंद केले गेले. पाच तास ही सर्जरी सुरू होती. त्यानंतर १२ आठवड्यांनी सिझेरियन करून या महिलेची प्रसूती केली गेली.

या प्रकारे गर्भात ट्यूमर होण्याच्या प्रकाराला सेरोकोसिजल टेराटोमा असे म्हणतात व मुलाच्या तुलनेत मुलीच्या गर्भाला असा ट्यूमर होण्याचे प्रमाण अधिक आहे असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Leave a Comment