मिस्त्री टाटांच्या अन्य कंपन्यांचा राजीनामा देणार नाहीत

curus
टाटा ग्रुपच्या अध्यक्षपदावरून काढले गेलेले सायसर मिस्त्री अन्य मुख्य कंपन्यांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या विचारात नाहीत असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून समजते. टाटा सन्सच्या प्रमुखपदावरून ते पायउतार झाले असले तरी टीसीएस, टाटा स्टील, टाटा मोटर्स,इंडियन हॉटेल्स, टाटा पॉवर, टाटा ग्लोबल बेवरीज, टाटा केमिकल्स, टाटा इंडस्ट्रीज, टाटा टेलिसव्र्हिसेस या मुख्य कंपन्यांचे अध्यक्षपद सोडण्याबाबत त्यांनी अजून कोणताही विचार केलेला नसल्याचे समजते.

इंडियन हॉटेल्सची आज म्हणजे ४ नोव्हेंबरला तर केमिकल्सची १० नोव्हेंबरला वार्षिक बैठक होत आहे या दोन्ही बैठकांना मिस्त्री हजर राहणार आहेत असेही सांगितले जात आहे. या सर्व कंपन्यांची जबाबदारी मिस्त्री सांभाळणार आहेत. २४ आक्टोबरला त्यांना अचानकच टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून दूर केले गेले होते त्यानंतर मिस्त्री अन्य कंपन्यांच्या प्रमुखपदाचा राजीनामा देणार वा कसे याबाबत चर्चा सुरू होती.

Leave a Comment