एसटी स्थानकात आता विक्रीसाठी ठेवली जाणार जेनेरिक औषधे

generic
मुंबई : आता जेनेरिक औषधे ही राज्यातील एसटी स्थानकांवर विक्रीसाठी ठेवली जाणार असून राज्य सरकारने बैठकीत नुकताच यासंबंधी निर्णय घेतला असल्यामुळे प्रवाशांना स्वस्त दरात औषधे मिळणार आहेत. राज्यातील ५६८ एसटी आगारांमध्ये जेनेरिक औषधं उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. एसटी महामंडळाकडून यापूर्वीच निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारनेही जेनेरिक औषधे विकण्याचा निर्णय घेतला आहे. पण ही जेनेरिक औषधे सहजपणे उपलब्ध नसल्याने आता ती एसटी स्थानकांमध्ये विक्रीसाठी ठेवली जातील. दरम्यान राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर एसटी महामंडळाच्या अधिकारी आणि आरोग्य विभागाची संयुक्त बैठकही होणार आहे. यात जेनेरिक औषधांची विक्री कशी करायची याचा विचार केला जाईल.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment