मेणबत्तीच्या आसेने हा अवलिया कापतो ग्राहकांचे केस!

hair-cutting
दरवेळी आपण पाहत आलो आहोत की कात्री आणि कंगव्याने केसांना कापणे आणि स्टाईलिश करणे ही एक सामान्य बाब आहे. पण याला अपवाद ठरला आहे अवलिया, ज्याची केस कापण्याची स्टाईलच जरा वेगळी आहे. केस कापण्यासाठी हा व्यक्ती अशा वस्तूचा वापर करतो, ज्याचा विचारही तुम्ही कधी केला नसेल. तो त्याच्या या स्टाईलने चांगलाच लोकप्रिय झाला आहे.

कर्नाटकमधील गुलबर्गातील शाहबाद गावात दशरथ हे आपले सलून चालवतात. सध्या अनोख्या पद्धतीने केसांना स्टाईल करण्यामुळे ते चर्चेत आले आहेत. केसांना कापण्यासाठी आणि स्टाईल करण्यासाठी दशरथ जळती मेणबत्तीचा वापर करतात. दशरथ केसांना मेणबत्तीच्या आसेने जाळतात आणि नंतर त्याला स्टाईल करतात.

दशरथ यांच्या मनात हा विचार तेव्हा आला जेव्हा एक दिवस त्यांच्या दुकानातील लाईट गेली होती. तेव्हा एक ग्राहक त्यांच्याकडे आला आणि केस त्याने केस कापण्यास सांगितले. दशरथने प्रकाशासाठी मेणबत्ती पेटवली. तेव्हापासून दशरथने ग्राहकांच्या सहमतीने मेणबत्ती केसांना स्टाईल करण्याचा निर्णय घेतला.

त्यांचे रेग्युलर ग्राहक सांगतात की, दशरथ यांची ही केस कापण्याची स्टाईल ग्राहकांचे केस अधिक चांगले होत आहेत. गेल्या पाच-सहा वर्षांपासून दशरथ हे याच स्टाईलने केस कापतात आणि चांगली अशी गोष्ट आहे की, ते नेहमीच या बाबतीत सतर्कता ठेवतात.

Leave a Comment