ब्लॅकबेरीचा शेवटचा स्मार्टफोन बाजारात

blackberry
मुंबई : आपला तिसरा आणि शेवटचा अँड्रॉईड स्मार्टफोन डीटेक ६० कॅनेडियन स्मार्टफोन मेकर कंपनी ब्लॅकबेरीने लॉन्च केला असून हा स्मार्टफोन अॅपल आयफोन ७ आणि गूगलच्या पिक्सेल डिव्हाईसपेक्षाही स्वस्त आहे. या स्मार्टफोनची किंमत सुमारे ३३ हजार रुपये आहे. ब्लॅकबेरीचा हा शेवटचा स्मार्टफोन असल्याने यातील फीचर्सबाबत अनेकांना उत्सुकता होती.

डिटेक ६० स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर, ५.५ इंचाचा डिस्प्ले, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८२० प्रोसेसर, ४ जीबी रॅम, २१ मेगापिक्सेलचा रिअर आणि ८ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा, टाईप-सी यूएसबी पोर्ट आणि मार्शमॅलो ६.० ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आले आहे.

ब्लॅकबेरी कंपनीला स्मार्टफोनच्या माध्यमातून २०१६-१७ या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत अपेक्षित नफा झालेला नाही. कंपनी सध्या तोट्याचा सामना करत असल्यामुळे आपल्या ट्रेडिशनल स्मार्टफोनचे उत्पादन बंद करुन केवळ सॉफ्टवेअर बिझनेसवर फोकस करणार आहे.

Leave a Comment