
गुरगाव – भारती एअरटेल कंपनीने रिलायन्स जिओकडून मोफत व्हाईस कॉलच्या घोषणेवर आक्षेप नोंदविला असून, या प्रकरणात लक्ष घालण्याबाबत ट्रायला (टेलिकॉम रेग्युलटरी ऑथोरिटी ऑफ इंडिया) विनंती केली आहे.
एअरटेलचा रिलायन्सच्या मोफत ‘व्हाईस कॉल’ घोषणेवर आक्षेप
भारती एअरटेलचे अध्यक्ष सुनिल मित्तल यांनी जीएसएमएद्वारे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना ट्रायला विनंती केली. ते म्हणाले, की आयुष्यभर मोफत काहीच असू शकत नाही. रिलायन्सकडून देण्यात आलेले मोफत व्हाईस कॉल आश्वासनाचा ट्रायने निपटारा करावा, अशी मागणी मित्तल यांनी केली. दरम्यान कम्युनिकेशन प्राधिकरण कंपनीने यापूर्वी जिओने जाहीर केलेल्या घोषणात अडचणी नसल्याचा निर्वाळा दिला आहे.
