उचलबांगडी प्रकरणी न्यायालयात जाणार सायरस मिस्त्री !

cyrus-mistry
मुंबई: सायरस मिस्त्री यांना टाटा उद्याग समुहाच्या अध्यक्षपदावरून संचालक मंडळाने जबरदस्तीने टाटा करायला लावण्यात आल्याने ते आता न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याची शक्यता आहे. रतन टाटा यांचे उत्तराधिकारी म्हणून सायरस मिस्त्री यांनी टाटा उद्योग समुहाची सुत्रे हातात घेतली होती. सुमारे चार वर्षे त्यांनी टाटाची धुरा सांभाळली. त्यांचा कार्यकाळ २०२२ पर्यंत होता. मात्र, संचालक मंडळाने त्यांना मधूनच डच्चू दिला. त्यामुळे आपल्यावर झालेल्या अन्याविरोधात दाद मागण्यासाठी ते मुंबई उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, टाटा समुहामध्ये झालेल्या बदलांबद्दल रतन टाटा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून माहिती दिली आहे.

या पदावरून मिस्त्री यांची हकालपट्टी करण्यात आल्यावर टाटाच्या सर्च पॅनलने नव्या चेहऱ्याचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान, मेस्त्री यांच्या हकालपट्टीनंतर हंगामी अध्यक्ष म्हणून चार महिन्यांकरता टाटा उद्योग समुहाची धुरा रतन टाटा यांनी पुन्हा एकदा आपल्या खांद्यावर घेतली आहे. नव्या चेहऱ्याचा शोध लागताच सर्च पॅनलने शोधलेला नवा चेहराच टाटा उद्योग समुहाचा अध्यक्ष होईल.

टाटाच्या अध्यक्षपदासाठी नव्या चेहऱ्याचा शोध घेणाऱ्या नव्या चेहऱ्यामध्ये रतन टाटा यांच्यासोबतच, उद्योगपती वेणु श्रीनिवासन, बेन कॅपीटल प्रा. लि.चे इक्विटे प्रबंध निर्देशक अमित चंद्रा, अमेरिकेतील भारताचे माजी राजदूत रोनेन सेन, बार्बिक मॅन्युफॅक्चरींग ग्रुपचे अध्यक्ष लॉर्ड कुमार भट्टाचार्य यांचा समावेश आहे. सायरस मिस्त्री यांना हटविण्यात आल्यावर टाटा उद्योगाच्या व्यवस्तापनात मात्र अद्याप तरी कोणताही बदल करण्यात आला नाही.

टाटाच्या अध्यक्षपदाचा खांदेपालट झाला तेव्हा कंपनीची वार्षिक उलाढाल १०० अरब डॉलर इतकी होती. निवडमंडळाने मिस्त्री यांच्या हातात कंपनीचा कारभार देतना २२२२ पर्यंत कंपनीची उलाढाल ५०० अरब डॉलरपर्यंत न्यावी असे टार्गेट दिले होते. मात्र, मिस्त्रींच्या कार्यकाळात टाटाची गती अगदीच सुस्त झाली. तसेच, त्यांचा प्रोजेक्ट कोणत्याच प्रकारे गती पकडत नसल्यामुळे निवडमंडळ नाराज होते.

Leave a Comment