पाण्यात तरंगणारा कॉमेट फोन

comet
कॉमेट कंपनीने पाण्यात तरंगणारा व शानदार फिचर्सचा मोबाईल स्मार्टफोन बाजारात आणला असून त्याचे प्री बुकींग सुरू झाले आहे. ३२ व ६४ जीबी व्हेरिएंटमध्ये असलेला हा फोन कंपनीच ऑफिशियल साईटवर उपलब्ध असून सध्या त्यावर ४० टक्के डिस्काऊंट दिला जात आहे. ३२ जीबी साठी त्याची किंमत १६ हजार तर ६४ जीबीसाठी १९ हजार रूपये आहे.

या फोनला ४.७ इंची फुल एचडी डिस्प्ले, मल्टीटास्कींग चांगल्या प्रकारे करता यावे यासाठी ४ जीबी रॅम, अँड्राईड मार्शमेलो ६.१ ओएस, १६ एमपीचा रियर व फ्रंट कॅमेरा ऑटोफोकस व एलईडी फ्लॅशसह दिला गेला आहे. यावर एचडी व्हिडीओही काढता येतात. हा फोन वॉटरप्रूफ, डस्टप्रूड तर आहेच पण तो पाण्यात बुडत नाही तर तरंगतो. ड्युअल नॅनो सिमच्या या फोनला कनेक्टीव्हीटीसाठी फोरजी, थ्रीजी व अन्य ऑप्शन्स आहेत. काळा, फिकट सोनेरी व आईसबर्ग व्हाईट अशा तीन रंगात तो उपलब्ध आहे.

Leave a Comment