फोटोफोकस्ड कोडॅक स्मार्टफोन लाँच

ektra
फोटोप्रेमींसाठी कोडॅक या जगप्रसिद्ध कंपनीने फोटो फोकस्ट स्मार्टफोन अॅक्ट्रा या नावाने बाजारात आणला आहे. हा फोन सध्या युरोपात लाँच केला गेला असून त्याची किंमत आहे ४९९ पौंड म्हणजे ३६८००रूपये. युनिक डिझाईनच्या या फोनला बॅकसाईडला मोठा कॅमेरा लेन्ससह दिला गेला असून त्यात डीएसएलआर कॅमेर्‍याची सर्व फिचर्स आहेत. या स्मार्टफोनचे उत्पादन यूके बेस्ड कंपनी बुलीट ग्रूपने केले आहे. या कंपनीकडे कोडॅकचे बौद्धिक संपदा हक्क वापरण्याचा परवाना आहे.

या स्मार्टफोनचे वैशिष्ठ म्हणजे २१ एमपीचा फास्ट फोकस कॅमेरा. रियर सेन्सर ओआयएस, एफ/२.० अॅपर्चर पीडीएएफ, ड्युअल एलईडी फ्लॅश, १३ एमपीचा फ्रंट कॅमेरा, स्मार्ट ऑटो, पोट्रेट, मॅन्युअल स्पोर्टस, बोके, नाईट टाईम, एचडीआर, पॅनोरमा, मॅक्रो, लँडस्केप, फोर के व्हिडीओ अशी डीएसएलआची सर्व फिचर्स. त्यात प्रिंट नावाचे प्रीलोडेड अॅपही असून त्यामुळे फोटोच्या फिजिक कॉपीज काढता येतात. लेन्सला प्रोटेक्शनसाठी मेटल रिंग दिली गेली आहे.

अन्य फिचर्समध्ये पाच इंची फुल एचडी डिस्प्ले, ३ जीबी रॅम,३२ जीबी इंटरनल मेमरी, मायक्रो कार्डच्या सहाय्याने वाढविण्याची सुविधा, ३००० एमएएच बॅटरी, युएसबी टाईप सी चार्जिंग ही आहेत. कोडॅकने यापूर्वी आणलेला आयएम ५ स्मार्टफोन बाजारात अयशस्वी ठरला होता.

Leave a Comment