
अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशनने कॅनडातील कंपनी ब्रुकफिल्ड बरोबर करार करून आर कॉमचे टॉवर व्यवसायातील ५१ टकके हिस्सा विकला आहे. यासाठी ब्रुकफिल्डने आर कॉमला ११ हजार कोटी रूपये मोजले आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात आजपर्यंत आलेल्या प्रत्यक्ष परदेशी गुंतवणुकीतील ही सर्वात मोठी गुंतवणुक असल्याचे समजते.
रिलायन्स कम्युनिकेशन व ब्रुकफिल्डमध्ये टॉवर व्यवसाय करार
या डीलनंतर आरकॉमचा शेअरही सुधारला आहे. मिळालेल्या रकमेतून आरकॉम कर्ज फेड करणार आहे. करारानुसर आरकॉम रिलायन्स इंन्फ्रा टेल अॅसेटस एसपीव्ही ट्रान्स्फर करणार असून या डीलनंतरही आरकॉम टॉवर अॅसेट मध्ये प्राईमच राहणार असल्याचेही समजते. कारण कंपनीकडे ४९ टक्के हिस्सा राहणार आहे.
