गॅलेक्‍सी नोट ७ ने सॅमसंगला घातले खड्यात

samsung
सोल : सॅमसंगला ‘गॅलेक्‍सी नोट ७‘ या स्मार्टफोनमधील त्रुटी महागात पडणार असून, कंपनीच्या नफ्यात पुढील दोन तिमाहीत तब्बल ३ अब्ज डॉलरपेक्षा अधिक फटका बसेल, असे शुक्रवारी कंपनीने जाहीर केले. बाजारपेठेत कंपनीच्या अन्य स्मार्टफोनची चांगली विक्री सुरू असल्याने याचा कंपनीवर फारसा परिणाम होणार नाही, असे सॅमसंगने स्पष्ट केले आहे.

तिसऱ्या तिमाहीतील नफ्यात २.३ अब्ज डॉलरची घसरण होईल, असे दोन दिवसांपूर्वी दक्षिण कोरियातील इलेक्‍ट्रॉनिक क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या सॅमसंगने म्हटले होते. गॅलेक्‍सी नोट ७ चे उत्पादन पूर्णपणे थांबविण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. हा निर्णय म्हणजे उच्च उत्पादन दर्जा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान अशी बिरुदे मिरविणाऱ्या कंपनीसाठी नामुष्कीचा ठरला आहे. गॅलेक्‍सी नोट ७ चे उत्पादन बंद केल्यापासून कंपनीच्या अन्य स्मार्टफोनच्या विक्रीत घसरण होत आहे. ऑक्‍टोबर ते मार्च या काळात कंपनीच्या नफ्यावर यामुळे परिणाम होणार आहे.

Leave a Comment