
जगात व्यवसाय करणार्या बहुतेक सर्व एअरलाईन्स उत्तम सेवेसाठी आपली ओळख व्हावी यासाठी प्रयत्नशील असतात. विमानसेवा देताना हवाई सुंदरींची भूमिकाही महत्त्वाची असते हे लक्षात घेऊन व्हिएतनाममधील व्हिएत एअर या कंपनीने त्यांच्या हवाई सुंदर्यांना अधिकच आकर्षक स्वरूपात पेश केले आहे. परिणामी या विमान कंपनीच्या तिकीटांसाठी नेहमीच प्रतीक्षा यादी असते असे समजते.
या एअरलाईन्सच्या तिकीटासाठी असते प्रतीक्षायादी
व्हिएत एअरच्या एअरहोस्टेस प्रवाशांचे स्वागत करताना चक्क बिकीनीमध्येच असतात. यामुळे व्हिएतनामची ही खासगी कंपनी अल्पावधीत लोकप्रिय ठरली आहे. अर्थात अन्य विमानकंपन्यांनी एअरहोस्टेसच्या या युनिफॉर्मला आक्षेप घेतला आहे मात्र ही कंपनी केवळ आकर्षक एअरहोस्टेससाठीच नाही तर चांगल्या सेवेसाठीही नाव कमावून आहे. त्याच्या प्रवाशंाच्या गरजांकडे ही कंपनी व्यवस्थित लक्ष पुरविण्याबद्दलही प्रसिद्ध झाली आहे.

एअरहोस्टेससाठी बिकीनीचा युनिफॉर्म ठेवण्याची कल्पना कंपनीची सीई्रओ न्गुसेन हिची असल्याचे समजते. ती म्हणते, महिलांनी अगदी विमान कंपन्यांतील एअरहोस्टेसनीही कोणते कपडे वापरायचे याचा हक्क आहे. या एअरहोस्टेसचे दरवर्षी कॅलेंडर फोटोशूटही होते व एन्जॉय फ्लाईंग ही त्यांच्या कंपनीची टॅगलाईन आहे. विशेष म्हणजे अल्पावधीतच या एअर लाईनने ३० टक्के मार्केट शेअर काबीज केला आहे. तज्ञांच्या मते या कंपनीची सीईओ तिच्या या अनोख्या कल्पनेमुळे अब्जाधीश होण्याच्या मार्गावर आहे.
