
मुंबई : सणासुदीत नेहमी महाग होणारे सोने यंदा सतत स्वस्त होत आहे. तीन वर्षे जुन्या स्थितीवर सध्या सोन्याचे भाव पोहोचले. मंगळवारी सोने ३१ हजार ते ३१५०० दरम्यान होते. २०१३ मध्ये दसऱ्यावेळी हा भाव ३१००० रुपये होता.
दिवाळीत आणखी स्वस्त होणार सोने
असोचेमनुसार, या वर्षी सोने २५ टक्क्यांनी महागले. मात्र गेल्या आठवड्यात याची झळाळी दीड ते हजार रुपयांपर्यंत कमी झाली. चार दिवसांमध्ये किंमत १०१० रुपयांपर्यंत कमी झाली आहे. अहवालानुसार, गेल्या आठवड्यादरम्यान बाजारपेठेत सोन्याची विक्री ४५ ते ५० टक्क्यांपर्यंत घसरली.
